Galaxy Wearable गोपनीयता सूचना शेवटचे अद्ययावत केलेले: 1 एप्रिल, 2021 Samsung Electronics Co., Ltd. येथे, आमच्या ग्राहकांसाठी गोपनीयता किती महत्त्वाची आहे ते आम्ही जाणतो. आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कशी संग्रहित करतो आणि वापरतो हे तुम्हाला समजेल याची खात्री करण्यासाठी ही गोपनीयता सूचना आम्ही तयार केली आहे. आमचे गोपनीयता धोरण - जे https://account.samsung.com/membership/terms/privacypolicy - येथे पाहता येऊ शकते, ते तुमच्या Galaxy Wearable च्या वापराला देखील लागू होते. आम्ही तुमचा डेटा कसा वापरतो याबाबत आमच्या गोपनीयता धोरणात अधिक माहिती आहे. यामध्ये आमच्याशी संपर्क कसा करावा याबाबतही माहिती समाविष्ट आहे. या गोपनीयता सूचनेसह कृपया आमचे गोपनीयता धोरण वाचा. तथापि, या गोपनीयता सूचनेचे नेहमी गोपनीयता धोरणावर प्रभुत्व राहते. आम्ही कोणती माहिती संग्रहित करतो? तुमच्या Galaxy Wearable मार्फत, आम्ही विविध मार्गांनी तुमच्याबद्दल माहिती संग्रह करतो आणि ठेवत असतो. तुम्ही थेट देत असलेली माहिती • जेव्हा तुम्ही तुमच्या Galaxy Wearable उपकरणावर Samsung account ला लॉग इन होता, तेव्हा तुमच्या Samsung account ID सारखी तुमची Samsung account माहिती. तुमच्या Galaxy Wearable च्या तुमच्या वापराबाबत माहिती • तुमच्या उपकरणाबद्दल माहिती, जसे की उपकरण प्रकार, उपकरण मॉडेल, OS प्रकार आणि आवृत्ती, उपकरण अभिज्ञापके आणि इतर अनन्य अभिज्ञापके, मोबाइल नेटवर्क प्रदाते, उपकरण कॉन्फिगरेशन्स आणि सेटिंग्स; • GPS, ब्लुटूथ आणि Wi-Fi सिग्नलसच्या माध्यमातून तुमच्या स्थानाशी संबंधित माहिती. तुमच्या Galaxy Wearable च्या काही वैशिष्ट्यांना तुमच्या उपकरणाच्या अचूक भौगोलिक स्थानाची आवश्यकता असते आणि त्या घटनांमध्ये तुमचे भौगोलिक स्थान, आम्ही मात्र तुमच्या परवानगीने संग्रह करू. Galaxy Wearable वैशिष्ट्याला तुमचे अचूक भौगोलिक स्थान संग्रह करण्याची केव्हा गरज असेल ते तुमचे उपकरण सूचित करेल. कृपया नोंद घ्या तुम्ही Galaxy Wearable ला तुमचे अचूक भौगोलिक स्थान संग्रह करण्याची अनुमती न दिल्यास, तुम्ही Galaxy Wearable ची सर्व वैशिष्ट्ये वापरू शकणार नाही; • जेव्हा तुम्ही रिमोट कनेक्शन वैशिष्टय वापरता (जसे की तुमच्या Galaxy Wearable उपकरणाला ब्लुटूथ ऐवजी Wi-Fi किंवा मोबाइल डेटाने कनेक्ट करण्यासाठी वापरल्यास, तुमचे Galaxy Wearable तुमच्या फोनकडून संदेश प्राप्त करू शकते); तुमच्या मोबाइल उपकरणावर स्थापित केलेल्या अनुप्रयोगाबद्दल माहिती जसे की अधिसूचना आणि प्राप्त संदेश यांची सामग्री आणि ईमेल (संदेश आणि मीडिया फाइल यांच्या समावेशासह); आणि • तुम्ही बॅकअप आणि पूर्वस्थित करा वैशिष्ट्य वापरल्यास, सॉफ्टवेअर आवृत्ती, विक्री कोड, स्थापित आणि अलीकडील वापरलेले अनुप्रयोग, डेटा आणि स्थापित अनुप्रयोगाची सेटिंग्स आणि विजेट अधिसूचना सेटिंग्स, डिस्प्ले, ध्वनी आणि कंपन यांच्या समावेशासह सिस्‍टम सेटिंग्स. • तुम्ही सहमत झाल्यास निदानात्मक डेटा, निदान, तांत्रिक त्रुटी आणि वापर माहिती जसे की तुमच्या Galaxy Wearable चा वापर आणि वेळ, तुमच्याद्वारे स्थापित अनुप्रयोग आणि किती काळ आणि केव्हा तुम्ही अनुप्रयोग उघडले किंवा बंद केले यासारखी वापर माहिती. आम्ही तुमच्या, तुमच्या Galaxy Wearable आणि अनुप्रयोग, तुमचे उपकरण Galaxy Wearable ला कनेक्ट केले आणि तुमच्या Galaxy Wearable चा वापर करण्याचा मार्ग जो आम्ही तुम्हाला संग्रहाच्या वेळी वर्णन केला त्याप्रमाणे आणि जेव्हा हे आवश्यक असेल तेव्हा, आम्ही तुमची संमती प्राप्त करू याबद्दल ही अन्य माहिती संकलित करू शकतो. आम्ही तुमची माहिती कशी वापरतो? • तुमच्या Galaxy Wearable साठी नोंदणी करण्यास आणि त्याचा वापरण्यास मदत करण्यासाठी.. • तुम्ही विनंती केलेल्या सेवा आणि वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी. • तुमच्या विनंत्या किंवा प्रश्नांना प्रतिसाद देण्यासाठी आणि तुमच्या Galaxy Wearable शी संबंधित तांत्रिक सहाय्याची तुम्ही विनंती करता, तेव्हा सहाय्य प्रदान करण्याच्या समावेशासह तुमच्या Galaxy Wearable बद्दल तुमच्याशी संवाद साधण्यासाठी. • तुम्हाला निवडक Samsung किंवा तृतीय-पक्षाच्या अ‍ॅप्स, वैशिष्ट्ये आणि सेवांसह संवाद साधण्याची आणि वापरण्याची परवानगी देण्यासाठी. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या अॅप्स आणि सेटिंग्स माहितीचा बॅकअप Samsung Cloud वर घेऊ शकता किंवा तुमच्या Galaxy Wearable वर Samsung Health वापरू शकता. • तुमच्या Galaxy Wearable शी संबंधित सानुकूल सामग्री आणि सेवा प्रदान करण्यासाठी. • केवळ तुम्ही आम्हाला वेगळी संमती दिली असेल तिथे, थेट विपणन संप्रेषणातून प्रचार आणि ऑफर पुरवण्यासाठी (जसे की पुश अधिसूचना, ईमेल आणि मजकूर संदेश), फक्त जिथे तुम्ही तुमची स्वतंत्र संमती दिली असेल. •Galaxy Wearable आणि आमच्या व्यवसायाचे चालन करणे, त्यांचे मूल्यांकन करणे आणि ते सुधारणे यासाठी (ज्यामध्ये नवीन उत्पादने आणि सेवा विकसित करणे, आमची उत्पादने आणि सेवा वाढवणे आणि सुधारणे; आमचे संवाद व्यवस्थापित करणे; आमची उत्पादने, सेवा आणि ग्राहक आधाराचे विश्लेषण करणे; विपणन संशोधन संयोजित करणे; डेटा विश्लेषण करणे आणि लेखा, लेखा परीक्षण आणि इतर अंतर्गत कार्ये करणे यांचा समावेश आहे). • आमची उत्पादने आणि सेवांबाबत तुमची मते विचारण्यासाठी आणि ग्राहक सर्वेक्षणे करण्यासाठी; आवश्यक असल्यास, तुमच्या स्वतंत्र संमतीने. • तुमच्या Galaxy Wearable साठी सॉफ्टवेअर अद्ययावते, देखभाल सेवा आणि समर्थन देण्यासाठी. • फसवणूक आणि इतर गुन्हेगारी कृत्ये, दावे आणि इतर दायित्वांपासून संरक्षण करणे, ते ओळखणे आणि प्रतिबंधित करणे. • ही गोपनीयता सूचना आणि गोपनीयता धोरणासह, लागू असलेल्या कायदेशीर आवश्यकता, संबंधित उद्योग मानके आणि आमची धोरणे यांचे पालन आणि अंमलबजावणी करण्यासाठी. तुमचा Galaxy Wearable, Samsung किंवा तृतीय पक्ष अनुप्रयोग, सेवा आणि वैशिष्ट्ये वापरण्याची किंवा कनेक्ट करण्याची क्षमता प्रदान करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Galaxy Wearable उपकरणावर Samsung Health किंवा Bixby Voice वापरू शकता. या Samsung आणि तृतीय पक्ष अनुप्रयोग, सेवा आणि वैशिष्ट्यांच्या स्वतःच्या गोपनीयता सूचना असू शकतात. त्या सेवा तुमच्या माहितीवर प्रक्रिया कशी करतात हे तुम्हाला समजले आहे ह्याची खात्री करण्यासाठी कृपया त्यांचा आढावा घ्या. आमच्या मालकीच्या किंवा नियंत्रित नसलेल्या इतर कोणत्याही लिंक केलेल्या किंवा दर्शविलेल्या अनुप्रयोग, सेवा किंवा इतर वैशिष्ट्याची सामग्री, वापर किंवा गोपनीयता पद्धतींसाठी आम्ही जबाबदार नाही. आम्ही तुमची माहिती कोणासोबत शेअर करतो? आम्ही तुमची माहिती आमच्या व्यवसायाच्या आत अंतर्गतरितीने आणि पुढील अस्तित्वांकडे, फक्त वर वर्णन केलेल्या उद्देशांसाठी उघड करू. * सहयोगी: आम्ही नियंत्रित करत असलेल्या किंवा आमच्या मालकीच्या इतर Samsung Electronics समूह कंपन्या; * सेवा प्रदाते: काळजीपूर्वक निवडलेल्या कंपन्या ज्या आमच्यासाठी किंवा आमच्यावतीने सेवा प्रदान करतात, जसे की डेटा सेवा जी आमच्यावतीने डेटा राखते. हे प्रदाते तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी देखील वचनबद्ध आहेत; * तुमचे Galaxy Wearable संरक्षित करण्यासाठी आवश्यक असेल तेव्हा किंवा कायद्याद्वारे आवश्यक असेल तेव्हा अन्य पक्ष: उदाहरणार्थ, तुमची माहिती उघड करण्यास कायद्याद्वारे, कायदेशीर प्रक्रियेद्वारे किंवा सरकारी प्राधिकरणांकडून न्यायालयाचा आदेशाद्वारे ते आवश्यक असू शकते. ते आमच्याकडून कायदा अंमलबजावणी, राष्ट्रीय सुरक्षितता, दहशतवाद-विरोधी किंवा लोकांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर मुद्दे या उद्देशांनीदेखील तुमची माहिती मागू शकतात; * कॉर्पोरेट व्यवहारांशी संबंधित इतर पक्ष: विलीनीकरण किंवा हस्तांतरण, संपादन किंवा विक्री यांचा भाग म्हणून किंवा दिवाळखोरीच्या प्रसंगी आम्ही तुमची माहिती तृतीय पक्षाकडे उघड करू शकतो; आणि * इतर पक्ष तुमच्या संमतीने किंवा तुमच्या निर्देशानुसार हे करू शकतात: या गोपनीयता सूचनेत वर्णन केलेल्या प्रकटीकरणांव्यतिरिक्त, तुम्ही वेगळी संमती दिल्यास किंवा अशा शेअरिंगची विनंती केल्यास, आम्ही तुमच्याविषयीची माहिती तृतीय पक्षांसोबत शेअर करू शकतो. या गोपनीयता सूचनेमध्ये अद्यतन तुमच्या Galaxy Wearable साठी आम्ही तुमची माहिती कशी संग्रह करतो आणि त्यावर प्रक्रिया करतो यातील बदलांबाबत किंवा संबंधित कायदे व विनियमनांतील बदलांबाबत तुम्हाला सूचित करण्यासाठी ही गोपनीयता सूचना अद्ययावत केली जाऊ शकते. हा दस्तऐवज शेवटी कधी अद्ययावत केला त्याची तारीख या गोपनीयता सूचनेच्या वरच्या बाजूला दाखवलेली असते. Version:P01.03.00